JNMS, JNMS | Jagadgurushree - Jagadgurushree Recognition
-- स्वामींचे गौरव --
सन २००० मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या हस्ते ‘शिवतेज पुरस्कार’ प.पू. स्वामीजींना प्रदान करण्यात आला.
११ एप्रिल २००४ उज्जैन, मध्यप्रदेश येथे प.पू. स्वामीजींना ‘धर्माचार्य’ पदवी देवून भूषविण्यात आले.
२१ ऑक्टोबर २००५ रोजी अयोध्येमध्ये सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत प.पू. स्वामीजींना ‘जगद्गुरु’ पदी विराजमान करण्यात आले.
५ डिसेंबर २००८ रोजी शिवप्रतापगड उत्सव समितीच्या अध्यक्षा विजया राजे भोसले, हिमानी सावरकर, मिलींद एकबोटे , सुभाष जोशी यांच्या हस्ते वाई, सातारा येथे ‘वीर जिवा महाला पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.
२५ मे २००९ रोजी मुंबई येथे विनायक सावरकर यांचे नातू विक्रम सावरकर यांच्या हस्ते ‘वीर सावरकर पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.
२० फेब्रुवारी २०१० रोजी शिव प्रतिष्ठान, कोल्हापूर, अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्या हस्ते ‘राष्ट्रसंत’ पदवी देवून भूषविण्यात आाले.
२० ऑगस्ट २०१० रोजी आर.एस.एस. संघटनेचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते ‘धर्मभास्कर पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले.
१४ एप्रिल २०१२ रोजी न्यू जर्सी, अमेरीका नासा अंतराळ संशोधन यांच्यातर्फे प.पू. स्वामीजींना ताम्रपट देवून सत्कार करण्यात आला. तसेच विधान परिषदश अमेरीका यांच्याकडूनही प.पू. स्वामीजींचा सत्कार करण्यात आला.