JNMS,JNMS | Sansthan - Sevadeneichhit ( Interested for Volunteer)
-- सेवा देणे इच्छित --
आपण अशी सेवा करु शकता धर्माचे तत्त्वज्ञान असे सांगते प्रत्येक जन्मास आलेल्या व्यक्तींवर अनेक ऋणांचा बोजा असतो. उदा. पित्यांचे ऋण, पूर्वजांचे ऋण, समाजांचे ऋण असे अनेक प्रकारे ऋण घेवून माणूस जगत असतो. माणूस बुद्धिवान प्राणी असल्याने त्याने स्वत:ची प्रगती साधत असताना हस्ते परहस्ते ऋणातून उतराई होण्याचा हरसंभव प्रयत्न करावा. त्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाने अशा ऋणातून ऋणमुक्त होवू शकता. आपण समाजाचे काही देणं लागतो असे मानणार्यांपैकी आपण असाल तर मग आपण समाजाची अशी ही सेवा करु शकता. जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज समाजाच्या उद्धारासाठी अनेक उपक्रम विनामुल्य राबवत आहेत. प्रस्तुत उपक्रमांना आपण बौद्धिकदृष्ट्या मदत करु शकता. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या तज्ञांची समाजाच्या उत्कर्षासाठी आम्हाला गरज आहे. यासाठी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली अनेक विषयांच्या समित्या कार्यरत आहेत. सदर समित्यांवर आपल्या शिक्षणाप्रमाणे, ज्ञानाप्रमाणे सदस्य म्हणून आम्ही घेवू इच्छितो. आपणास दोन महिन्याने एखादा दिवस या सामाजिक कार्यासाठी द्यावा लागेल. त्यासाठी आपण आहात तेथून ही आपले मार्गदर्शन फोनद्वारे किंवा वेब कॉन्फरन्सद्वारे आम्ही उपलब्ध करुन घेवू. सामाजिक सेवेची तगमग आपल्याला वाटत असेल तर स्वामीजींच्या संदेशाचे स्वागत करा.
॥ तुम्ही जगा, दुसर्याला जगवा ॥