JNMS, JNMS | Jagadgurushree - About Ramanadacharyji Maharaj
-- रामानंदाचार्यांची माहिती --
आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य हे माघ कृष्ण सप्तमी संवत् १५३२ म्हणजेच इ.स. १३०० साली श्री पुण्य शर्मा आणि सुशिला देवी यांच्या पोटी कान्यकुब्ज ब्राम्हण कुळात प्रवरा नदीच्या किनारी जन्माला आले. प्रत्यक्ष प्रभु रामचंद्रांनी त्यांच्या रुपात जन्म घेऊन सनातन धर्माला संघटीत करण्याचे काम केले.
|| रामानन्द: स्वयं राम: प्रादुर्भूतो महीतले ||
असे जगद्गुरु रामानंदाचार्यजींच्या बाबतीत म्हटले जाते. स्वत: रामच हिंदूधर्माचे रक्षण करण्याकरीता जगदगुरूं रामानंदाचार्य रूपात प्रकट झाले. असा संपूर्ण हिंदू जगताचा विश्वास आहे. या बालकाचे गोत्र वशिष्ठ असून तीन वर्षापर्यंत या बालकाला घराच्याबाहेर काढू नका, त्याला आरसा दाखवू नका असे वाराणसीच्या कुलपुरोहितांनी त्यांच्या आईवडीलांना सांगितले. चवथ्या वर्षी अन्नप्राशन संस्कार केले. त्यावेळी वेगवेगळ्या पदार्थां पैकी खीर हा पदार्थ त्या बाळाने सेवन केला. त्यामुळे त्या बाळाचा मुख्य आहार खीर झाला. त्यांचे वडील वेद, व्याकरण, योग यांचे पूर्ण ज्ञाते होते. ते बालक इतके एकपाठी होते की वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे अनेक ग्रंथ मुखोद्गत होते. त्याना शंख वजवण्याचा शौक होता. आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यावर काशी येथे विद्याध्ययन करण्यासाठी गेले. १२ वर्षानंतर त्यांनी अध्ययन पूर्ण करून स्वामी राघवानंदाचार्यजी यांच्याकडून पंचगंगाघाट, वाराणसी, उत्तरप्रदेश येथे संन्यासी दीक्षा घेतली. त्यांची गुरुपरंपरा खालीलप्रमाणे-
भगवान प्रभू रामचंद्र - सीताबाई - हनुमान - ब्रम्हाजी - वशिष्ठ मुनी - पराशर मुनी - व्यासमुनी - शुक्रमुनी - पुरुषोत्तमाचार्यजी - गंगाधराचार्यजी - सदानंदाचार्यजी - रामेश्वरनंदाचार्यजी - द्वारानंदाचार्याजी - देवानंदाचार्याजी - श्यामनंदाचार्यजी - शृथानंदाचार्यजी - चिदानंदाचार्यजी - पूर्णानंदाचार्यजी - श्रीयानंदाचार्यजी - हरीयानंदाचार्यजी - राघवानंदाचार्यजी - आद्य जगदगुरूं रामानंदाचार्यजी ज्ञानार्जन आणि तपस्या करण्यासाठी त्यानी प्रारंभ केला. त्याच्या ज्ञानाचा प्रभाव मोठमोठ्या साधू आणि विद्वानांवर पडू लागला. त्यामुळे सर्व धर्मातील ज्ञानपिपासू लोक आपली तृष्णा शांत करण्यासाठी त्यांच्यापाशी येत असत. सन १३९८ मध्ये बादशहा गयासुद्दीन तूघलक याने हरिद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात बैराग्यांची हत्या केली. त्यामुळे आद्य जगद्गुरु रामानंदाचार्यजींच्या तपस्येचा उपद्रव बादशहा आणि काही मुल्ला मौलावींना झाला. त्यामुळे स्वत: बादशहा रामानंदाचार्यंना शरण आला मुस्लीम साम्राज्यांकडून हिंदू लोकांना अनेक हालअपेष्टांचा आणि अनेक जाचक बंधनांचा, अटीचा सामना करावा लागत असे. त्यांच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी रामानंदाचार्यंनी बादशहाला बंदी उठवायला भाग पाडले.
१. जान्हवे आणि शेंडी वाढवायला जिजीया कर भरवा लागत, असे तो पूर्णत: उठविणे.
२. मंदिरे बांधण्यास घातलेला प्रतिबंध उठवला.
३.मोठ्या प्रमाणात मुसलमानांकडून ताकदीच्या जोरावर धर्मांतर सुरु होते ते बंद करून घेतले
४. मशिदीजवळ नवरदेवाची वरात आल्यावर त्याला घोड्यावरून उतरवून पायी चालत जायला लावू नये.
५. गोहत्या बंद करा.
६. रामनामाचा प्रचार करायला बंदी घालू नये.
७. हिंदूधर्मग्रंथ जाळून नष्ट करू नयेत. तसेच मंदिरांचा विध्वंस करू नये.
८. मोहरमच्या वेळी येणार्या हिंदू उत्सवांवर बंदी घालू नये.
९. महिलांवर अत्याचार करू नये.
१०. शंख वाजवायला बंदी घालू नये.
११. कुंभमेळा किंवा इतर हिंदूयागांवर कर लावू नये.
१२. श्रद्धावान हिंदू फकिराच्या दर्शनाला गेला तर फकिराने हिंदूधर्मानुसार उपदेश करावा
अशाप्रकारे हिंदूधर्माला पोषक असणार्या गोष्ठी बादशहा तुगलग कडून मान्य करायला लावून हिंदूधर्माचे संवर्धन करण्याचे काम श्री महाराजांनी केले.
श्री स्वामी रामानंदाचार्य महाराजांचे एकून १२ शिष्य होते. १. संत अनंतानंद २. संत सुखानंद ३. सुरासुरानंद ४. नरहरीयानंद ५. योगानंद ६. पिपानंद ७. संत कबीरदास ८. संत सेना न्हावी ९. संत धन्ना १०. संत रविदास ११. पद्मावती १२. संत सुरसरी असे एकूण १२ आधिकारी शिष्य होवून गेले. रामानंदाचार्यांनी हिंदूधर्मासाठी अनेक प्रकारे लढा दिला आणि रसातळाला गेलेला हिंदूधर्म आद्य जगदगुरूं शंकरानंदाचार्या नंतर रामानंदाचार्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. या आद्य जगदगुरूं रामानंदाचार्यांनी संवत १५३२ म्हणजे सन १४७६ मध्ये आपला देह ठेवला.