JNMS | Sansthan - 24 Hr Ambulancefree Seva,jnms
* मार्गावरील अपघातग्रस्तांसाठी २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवा *
राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढल्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. होणाऱ्या अपघातांमध्ये मोठी जिवीतहानी होत असल्याचे संस्थानाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सन २०१० पासून
१. मुंबई - गोवा महामार्ग
२. मुंबई - आग्रा महामार्ग
३. मुंबई - हैद्राबाद महामार्ग
४. मुंबई - अहमदाबाद महामार्ग
५. पुणे - बंगलोर महामार्ग
६. रत्नागिरी - नागपूर महामार्ग
७. लातूर - सोलापूर महामार्ग
८. औरंगाबाद - जालना महामार्ग
९. नांदेड - लातूर महामार्ग
या राष्ट्रीय महामार्गांवर या संस्थानाच्या ५२ ऍम्ब्युलन्स कार्यरत आहेत.
सदरची सेवा पूर्णत: विनामूल्य आहे. तसेच २४ तास ही सेवा कार्यरत आहे. आतापर्यंत वीस हजाराहून अधिक महामार्गावरील अपघात असल्याचे प्राण संस्थानाच्या या सेवेमुळे वाचलेले आहेत. संस्थानाच्या या सेवेचे समाजातून वारंवार कौतुक होत असते. या सेवेबद्दल संस्थानाला अनेक पारीतोषिके मिळालेली आहेत. महापूर, भूकंप आदी नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोना महामारीच्या काळातही २४ तास मोफत रुग्णसेवेकरिता रुग्णवाहिका कार्यरत असतात.
सध्या ही सेवा महाराष्ट्रातील ९ राष्ट्रीय महामार्गांवर सुरु आहे. थोड्याच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर संस्थानाच्या अशा विनामूल्य सेवेच्या रुग्णवाहिका कार्यरत असतील.