सर्व प्राणीमात्रांच्या स्थैर्याकरीता, उन्नतीकरीता, शांतीकरीता सतत सेवाकार्यात कार्यशील राहणे. सदरची सेवा एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून अखंड मानवतेसाठी आहे. भारतातील दुर्गमातील दुर्गम खेड्यापाड्यांपासून अगदी शहरी भागातील गरीब, गरजू, दीनदुबळया लोकांची तसेच पाळीव प्राण्यांची विनाशुल्क वेगवेगळ्या प्रकारची सेवा अखंडीतपणे सुरु आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका येथील बस्तवाड या गावातील सुमारे ४०० पूरग्रस्त कुटुंबियांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वितरण
१५/०८/२०२१ रोजी जिल्हाअधिकारी रायगड यांच्या वतीने संप्रदाय चा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रमाणपत्र मा,पालकमंञी कु.अदितीताई सुनिल तटकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
महाड येथे आलेल्या महापुराने परिसरात रोगराई पसरू नये म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानामार्फत दिनांक ०३ आँगस्ट २०२१ पासून विनामूल्य रुग्णसेवा सुरू केली आहे. संस्थानाची ५ फिरती रुग्णालये या सेवेत रुजू झाली आहेत.
प्रत्येक संकटात मदतीसाठी पुढे असणाऱ्या नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज संस्थाननेही राम मंदिरासाठी भरघोस निधी देत आपली सामाजिक बांधिलकी अधिक जपली आहे. 2 कोटी 53 लाख 24 हजार 152 रुपयांच्या निधीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे नरेंद्रचार्य महाराज ((Narendracharya Maharaj) यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला..
Corona या संकटावर मात करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला साद देऊन हा सहाय्यता निधी सरकारला देण्यात आला.
शिष्याने ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावयास हवी की, आपल्या प्रत्येक गुरुबंधूबरोबर सलोख्याचे संबंध ठेवावयास हवेत. आपापसात ईर्षा वा द्ववेष ठेवण्याने शक्ती क्षीण होते. तसेच चित्तवृत्ती त्याच गोष्टीत रस घेऊ लागते. साधनेत बसल्यानंतरही वारंवार तेच विचार समोर येत असतात. यासाठी दुसऱ्यांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करणे अत्यावश्यक आहे. व्यवहारातही सहनशीलता ठेवावी. मनाला इतरत्र भटकू न देता त्याला गुरुमंत्राच्या जपात अडकून ठेवावे