JNMS,JNMS Establishment,JNMS History, JNMS Vision and mission

संस्थान उद्देश

सर्व प्राणीमात्रांच्या स्थैर्य, उन्नती, प्रगती व शांती करिता सतत सेवाकार्यात कार्यशील राहणे. ही सेवा एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून अखंड मानवतेसाठी आहे. भारतातील दुर्गमातील दुर्गम खेड्यापाड्यांपासून अगदी शहरी भागातील गरीब, गरजू, दीनदुबळया लोकांची तसेच प्राण्यांची विनाशुल्क वेगवेगळ्या प्रकारची सेवा अविरतपणे सुरु ठेवणे.

इतिहास

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्म मौजे नाणीज तालुका जिल्हा रत्नागिरी येथे शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर १९६६ रोजी रात्रो साडेदहा वाजता झाला. बालपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ, १९८३ला एसएससी शिक्षण पूर्ण झाले आणि लागलीच २९ मार्च १९८५ ला ग्रामसेवक या सरकारी नोकरीवर रुजू झाले. बालपणातच अध्यात्माची ओढ असल्यामुळे त्यांनी १९८९ साली संत शिरोमणी गजानन महाराज (शेगाव) यांच्या आदेशाने प्रपंचात राहून परमार्थिक कार्याला सुरुवात केली. समाजातील तरुण वर्गामध्ये असलेली दुर्व्यसने (उदा. दारु, गांजा, चरस इ.) समाजाला कशी घातक आहेत हे समजावून सांगण्याकरिता, व्यसनांच्या विळख्यात अडकलेल्या अनेक तरुणांना, लोकांना व्यसनमुक्त करण्याकरिता प्रबोधनाच्या माध्यमातून सपाटा सुरु केला. त्याचबरोबर गरीबीने गांजलेल्या आणि शिक्षणाच्या बाबतीत अशिक्षित असलेला समाज अंधश्रद्धांचा बळी ठरत आहे हे पाहून त्यांना व्यापक समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे हे जाणून अध्यात्मातून विज्ञानाकडे घेवून जाण्याकरीता मोठी व्यापक चळवळ हाती घेतली.

त्याकरीता एफ. ९९५/१९९१.या नंबरने रजिस्ट्रेशन करुन संस्थेची निर्मिती केली. या कार्याचा व्याप संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात वाढू लागला. त्यामुळे नोकरी करणे अशक्य झाले. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज, कण्हेरी (कोल्हापूर) या गुरुवर्यांच्या आदेशाने १४ फेब्रुवारी १९९२ मध्ये ग्रामसेवक पदाचा आणि नोकरीचा राजीनामा देवून २४ फेब्रुवारी १९९२ माघ कृष्ण सप्तमी या गजानन महाराज प्रगटदिनी “स्व-स्वरूप” संप्रदायची स्थापना करून पूर्णत: अध्यात्मिक मार्गात स्वत:ला झोकून घेतले. "अध्यात्मिक मार्गातून समाजाची सेवा" हेच ब्रिदवाक्य उराशी बाळगून कार्याला सुरुवात झालेली असल्यामुळे समाजकार्य फारच व्यापक होवू लागले. तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा हे वेदतुल्य महावाक्य जगद्गुरु श्रेणी समाजाला दिले नुसते दिलेच नाही तर जगायला शिकवत आहेत

स्थापना

F९९५ या संस्थेचेे कार्यक्षेत्र मर्यादीत असल्यामुळे कार्याची व्यापकता वाढविण्यास अडचणी येवू लागल्या. त्यामुळे दि. १३/४/१९९४ रोजी मा. सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये ई/६९४ नंबरने "जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थाना "ची निर्मिती झाली. या ट्रस्टचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश असून या संस्थानातर्फे शिक्षण, आरोग्य, आपत्कालीन मदत, कृषी, प्राणीमात्रांचे संगोपन, दुर्बल घटकांचे लालन-पालन, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, हुंडा निर्मूलन, पर्यावरणाचे संरक्षण-संतुलन व संवर्धन, सामाजिक ऋणानुबंध, धार्मिक-अध्यात्मिक जनजागरण, ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तु, स्थळे, स्मारकांचे जतन इ. उपक्रम ही संस्था राबवत आहे. भारतातील १८ ते २० राज्यांमध्ये या संस्थानाचे सेवाकार्य जोमाने सुरु आहे..

 

-- अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा --