सामाजिक उपक्रम

शैक्षणिक-
अ) गरीब व गरजू शालेय मुलांना लाखो वह्यांचे दरवर्षी विनामूल्य वाटप केले जाते. आतापर्यंत काही लाख वह्यांचे वाटप केलेले आहे.

आ) गरीब व गरजू शालेय मुलांना गणवेषांचे दरवर्षी विनामूल्य वाटप केले जाते. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वाटप केलेले आहे.

इ) ज.न.म. संस्थानाच्या दत्तकपालक योजने अंतर्गत आतापर्यंत हजारोंच्या संख्येने शालेय मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेवून त्यांचा शिक्षणाचा खर्च संस्थानातर्फे केला जातो. सदरच्या मुलांना त्यांच्या शाळेमार्फत दत्तकपालक योजनेची रक्कम संस्थान सुपूर्द करते.

ई) संस्थानातर्फे अतिदुर्गम भागात विनामूल्य बालवाड्या (बालांगणे) चालविल्या जात होत्या.

उ) मुकबधीर मुलांच्या शाळेला ज.न.म. संस्थानतर्फे दरवर्षी अनुदान दिले जाते.

नरेंद्राचार्यजी स्कूलमध्ये शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव
नरेंद्राचार्यजी महाराज स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
नरेंद्राचार्यजी महाराज स्कूलमध्ये मुलांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन

वैद्यकिय-
अ) दरवर्षी गरीब, गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबीरे घेतली जातात. हजारोंच्या संख्येने या शिबीरांचा लाभ रुग्ण घेत असतात.

आ) जिल्ह्या-जिल्ह्यांना रक्तदान शिबीरे आयोजित केली जातात. या शिबीरातून जमा होणारे रक्त शासकिय रक्तपेढ्यांना दिले जाते. वेळोवेळी झालेल्या रक्तदान शिबीरातून आतापर्यंत लाखो बाटल्यांचे रक्तदान शासनाकडे करण्यात आलेले आहे.

इ) नेत्रदान या उपक्रमांतर्गत आतापर्यंत हजारो लोकांनी मृत्यूनंतर नेत्रदान करण्यासाठी प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे.

ई) गरीब, गरजू रुग्णांना ऑपरेशनसाठी आर्थिक मदत केली जाते. श्रवणयंत्र, कुबड्या, कृत्रिम अवयव, अपंगांना तीन चाकी सायकलींचे वाटप इ. अनेक गोष्टी रुग्णांसाठी या संस्थानातर्फे विनामूल्य केल्या जात आहेत.

नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाचे रुग्णालय ठरतेय वरदान

आपत्कालीन मदत उपक्रम-
भूकंप, पूर, दुष्काळ, वादळ इ. नैसर्गिक प्रकोपाच्या वेळी ज.न.म. संस्थानातर्फे कपडालत्ता, आर्थिक सहाय्य, औषधोपचार, भांडी-कुंडी, धान्य, जेवणखाण, इ. प्रकारे आपत्ग्रस्तांना मदत केली जाते. भूज- गुजरात, भूकंपाच्या वेळी संस्थानातर्फे मदत करण्यात आली. त्सुनामी लाटांच्या वेळी तसेच महाराष्ट्रात २६ जुलैला आलेला महापूर, गोव्यात आलेला महापूर, कोकणामध्ये आलेला महापूर यामध्ये संस्थानातर्फे मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली. सन २०१३ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मुक्या जनावरांना अन्नपाणी मिळेनासे झाले आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत ३६८ टन चारा जनावरांच्या छावणींना पुरविण्यात आलेला आहे. तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडाला ५० लाख रुपये देण्यात आलेले आहेत.

फोटो विभाग
सामाजिक उपक्रम २०१३

कृषी उपक्रम-
या उपक्रमांतर्गत शेतकर्यांना सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ज.न.म. संस्थानतर्फे कृषी शिबीरांचे आयोजन करण्यात येते. शेतकर्यांना बि-बियाणे वाटप करण्यात आलेले आहे. याशिवाय शेतीची वेगवेगळी अवजारे मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना पुरविण्यात आलेली आहेत.

फोटो विभाग
कृषी उपक्रम २०१३

प्राणीमात्रांना वैद्यकिय मदत-
ग्रामीण भागातील मुक्या पाळीव प्राण्यांचे रक्षण, संगोपन व पालन केले जाते. तसेच विनामूल्य पशुसेवेकरीता पशुवैद्यकिय दवाखाना लवकरच सुरु होत आहे.

निराधार व्यक्तींचे पुनर्वसन (आश्रम)-
समाजातील उपेक्षीत आबालवृद्धांचे या आश्रमाच्या माध्यमातून ज.न.म. संस्थान लालन-पालन करते. सन २००० पासून निराधार व्यक्तींना संस्थानाने आधार दिलेला आहे. मुख्य पीठ नाणीजधाम येथे त्यांच्यासाठी स्वतंत्र इमारत बांधून त्यांचे जेवणखाण, निवास, कपडालत्ता, औषधपाणी अशा जीवनावश्यक सर्व गोष्टी संस्थान त्यांना विनामूल्य पुरवत आहे. या निराश्रीत व्यक्तींची संपूर्ण सोय पूर्णत: विनामूल्य आहे.