जगदगुरूनरेंद्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव सोहळा

अश्विन शुद्ध अष्ठमी, वार शुक्रवार रात्रौ १०.०० वा. नाणीजधाम या ठिकाणी जग उद्धारक नरेंद्राचार्यांचा जन्म झाला. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्रौत्सव संपूर्ण भारतात साजरा होत असतो. अगदी याच कालावधीत नरेंद्रचार्याचा जन्मोत्सव येत असतो. या दिवशी वैदिक सनातन हिंदू संस्कृतीप्रमाणे हा जन्मोत्सव संपन्न केला जातो. स्वत: जगदगुरूआपले उपास्य दैवत गजानन महाराज आणि सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांची विधिवत पुजा करतात. भक्तही त्यांच्या वतीने आपल्या लाडक्या जगदगुरूमाऊलीस दिर्घायुष्य लाभावे म्हणून महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन केले जाते. मंदिरातील दैनंदीन सांजारती, शेजारती, धुपारती, शेजारती कार्यक्रम संपन्न होत असतानाच पालखी सोहळा देखील संपन्न केला जातो. अनेक साधु - संत जगदगुरूं ंचे दर्शन, आशिर्वाद घेण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले असतात. रात्रौ १०.०० वाजता सुहासिनी पंचारती ओवाळून अभिष्ठचिंतन करतात. साधु - संत जगदगुरूं ंचे औक्षण करतात. संपुर्ण दिवसभर संगीताशी संबंधित वेगवेगळे कार्यक्रम उदा. गायन, नृत्य, कला इ. संपन्न होत असतात. जगदगुरूं ंचेआशिर्वाद घेवुन या कार्यक्रमाची सांगता होते. हा उत्सव नवरात्रामध्ये येत असल्याने जवळजवळ सर्वच भक्त-शिष्यांची गैरसोय टाळण्यासाठी भक्त-शिष्यांनी जगदगुरूंना विनंती करुन २१ ऑक्टोबर या त्यांच्या जन्मदिनांकाला जन्मोत्सव आणि वर्धापनदिन असा हा उत्सव साजरा करावा अशी विनंती केली. त्यामुळे २१ ऑक्टोबर या दिवशी जन्मोत्सव सोहळा संपन्न केला जातो.