-- रुग्णवाहिका --

राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वर्दळ प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे. होणार्या अपघातांमध्ये मोठी जिवीतहानी होत असल्याचे संस्थानाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सन २०११ पासून १. मुंबई -गोवा २.मुंबई-आग्रा ३. मुंबई- हैद्राबाद ४. मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांवर या संस्थानाच्या २८ ऍम्ब्युलन्स कार्यरत आहेत.

सदरची सेवा पूर्णत: विनामूल्य आहे. तसेच २४ तास ही सेवा कार्यरत आहे. आतापर्यंत सुमारे दोन ते सव्वा दोन हजार व्यक्तींचे प्राण संस्थानाच्या या सेवेमुळे वाचलेले आहेत. संस्थानाच्या या सेवेचे समाजातून वारंवार कौतुक होत असते. या सेवेबद्दल संस्थानाला अनेक पारीतोषिके मिळालेली आहेत.

सध्या ही सेवा महाराष्ट्रातील चार राष्ट्रीय महामार्गांवर सुरु आहे. थोड्याच दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर संस्थानाच्या अशा विनामूल्य सेवेच्या ऍम्ब्युलन्स कार्यरत असतील.

Rugnvahika1.jpg
Rugnvahika2.jpg
 
Rugnvahika3.jpg
Rugnvahika4.jpg