धार्मिक उपक्रम

धार्मिक उपक्रम- श्रीक्षेत्र नाणीजधाम या मुख्य पीठामध्ये तसेच मराठवाडा पीठ, गोवा पीठ आणि मुंबई पीठ या ठिकाणी संपूर्ण विश्वाच्या कल्याणाकरीता दर दोन महिन्यांनी विश्वशांती यज्ञांचे आयोजन केले जाते. विश्वामध्ये स्थैर्य नांदो, शांती प्रस्थापित व्होवो या करीता या श्रीक्षेत्री येणारे लाखो उपासक परमात्म्याची उपासना करुन त्याच्याकडे विश्वकल्याणाची इच्छा व्यक्त करतात.

धार्मिक, अध्यात्मिक उपक्रम-

अध्यात्मिक मार्गातून जनसेवा करण्यासाठी गोवा पीठ, नाणीज पीठ, परभणी पीठ, नागपूर पीठ, मुंबई पीठ अशी अध्यात्मिक पीठांची निर्मिती केलेली असून या पीठांमार्फत अध्यात्मिक व धार्मिक ज्ञान दिले जाते. साधारणत: दर दोन महिन्यांनी वारी उत्सव आयोजित केला जातो. या वारी उत्सवाला सुमारे दिड ते दोन लाख भाविकांची उपस्थिती असते. या वारी उत्सवातून धर्म, अध्यात्म, संस्कृती, एकात्मता, मानवता या विषयांवर प्रबोधन केले जाते. सर्व जातीधर्माचे लोक या कार्यक्रमात अत्यंत जिव्हाळ्याने सक्रिय सहभागी झालेले असतात.

अध्यात्मिक, धार्मिक ज्ञान देणे, भक्ती, उपासना शिकविणे, साप्ताहिक संतसंग करणे, बालोपासना शिकविणे, प्रवचनकार तयार करणे ही कार्ये या पीठातर्फे सुरु आहेत.

या पीठाची गुरुशिष्य परंपरा अखंडीत राहण्यासाठी दर महिन्याला अनुग्रह दिला जातो. या पीठाचे काही लाखोंच्या घरात शिष्य आहेत. याशिवाय साधकदिक्षा दिली जाते. या संप्रदायाचे लाखोंच्या घरात साधक सुद्धा आहेत. या संप्रदायात शिष्य, साधक, भक्त व हितचिंतक मिळून काही कोटीमध्ये संप्रदाय आहे. या संप्रदायाचे संस्थापक आदरणीय जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आहेत.

या पीठातर्फे विश्वशांती प्राप्त होण्याकरीता कुंभमेळ्याच्या ठिकाणी अन्नदान सेवा, साधुसंतांची सेवा, साधुसंमेलने आयोजित करतात. श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज एक प्रमुख हिंदूधर्मगुरु असल्याने कुंभमेळ्यामध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली अध्यात्मिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असतात. धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक जनजागरण करण्याकरीता आदरणीय श्री स्वामी नरेद्राचार्यजी महाराज स्वत: ‘धर्मक्षेत्र नाणीजधाम’ या नावाचे मासिक लिहितात. याशिवाय ‘मुक्तीचे राजमार्ग, जीवनयात्रा, स्वधर्मदीप आणि भजनमाला, जीवनरहस्य, आत्मानंदाच्या शोधात, गृहस्थीने कसे वागावे? अमृतवाणी, ब्रह्मस्फुरण, जागा हो हिंदू बांधवा, भेद अंधश्रद्धेचा, बालामृत इ. पुस्तके स्वत: जगद्गुरु श्रींनी लिहिलेली असून त्यामार्फत अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि व्यवहारीक जग यावर प्रकाश टाकला आहे.